मुंबईत राडा! प्रभादेवीत ठाकरे VS शिंदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?
मुंबई शिंदे वि टॅककेरे कॅम्प न्यूज: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारण आता तापायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी (Prabhadevi News) परिसरात सुशोभीकरणाच्या कामावरुन या वादाची ठिणगी पडली. यामधून प्रभादेवी सर्कल येथे ठाकरे आणि शिंदे सेनेचे (Shinde Camp) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभादेवी सर्कल येथील सुशोभीकरणाच्या कामावरुन दोन्ही गटात वाद होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पालिकेकडून येथील कामाच्या वर्क ऑर्डर मिळाल्या होत्या. यावरुन आज सकाळी ठाकरे (Thackeray Camp) आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात राडा झाला. दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police) दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काही वर्षांपूर्वी प्रभादेवीत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता. विद्यमान आमदार महेश सावंत आणि शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते त्यावेळी एकमेकांना भिडले होते. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता तेव्हा तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला होता. यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या कारणामुळे दादर-माहीम विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत असतो. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी राजकीय लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.
याबाबत शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे, त्यामुळे आम्ही हे काम करत होतो. आम्हाला निधी देखील उपलब्ध झाला आहे या कामासाठी. या आधी देखील सदा सरवणकर यांनी या चौकासाठी निधी उपलब्ध केला होता आणि काम केलं होते. त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही. काम हे दहा दिवसांपासून सुरु आहे. पण आम्ही जिकडे काम केलं जिकडे आमचे नाव आहेत तिकडे काही लोक रंगरंगोटी करून त्यांची नावे लावत आहेत. एवढं होतं तर त्यांनी डीपीडीसीमधून निधी आणायला हवा होता. आज पण आम्ही माहीम मतदारसंघासाठी अनेक काम करतो. त्यांना एवढाच असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. फार मोजके लोक आहेत जे आमच्यामध्ये खोडा घालत आहेत. आमच्या कॉन्ट्रॅक्टरला देखील धमकवण्यात आले होते. पण आम्ही नेहमी चांगली काम या मतदारसंघासाठी करत राहतो आणि करत राहणार, असे समाधान सरवणकर यांनी म्हटले.
Shivsena Thackeray Camp: मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक
मातोश्रीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राज्यातील जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनंतर जिल्हाप्रमुखांसोबत उद्धव ठाकरे युती संदर्भात काही चर्चा करतात का किंवा काही सूचना करतात का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला पक्षाचे काही प्रमुख नेते सुद्धा उपस्थित असतील. विनायक राऊत आणि भास्कर जाधव या बैठकीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=ft6oiwne2jw
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.