भारतात खेळाडूंचे घरं जाळले जातात, हिंदुस्तानी असल्याचं सिद्ध करावं लागतंय; आफ्रिदी पुन्हा बरळला

शाहिद आफ्रिदी एशिया कप 2025: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भारताविरोधात सतत गरळ ओकत असतो. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना रंगण्याआधी पुन्हा एकदा आफ्रिदीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो म्हणताना दिसतो की, भारतात खेळाडूंना घरं जाळून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या बहिष्काराची मागणी होत होती कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं उघड झालं होतं. त्या हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी गेला होता. त्यानंतरही आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकला होता. आणि आता, सामना होण्यास काहीच दिवस बाकी असताना, त्याने पुन्हा असंच विधान केलं आहे.

शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) या सगळ्या गोष्टी पाकिस्तानच्या ‘समा टीव्ही’ या चॅनेलवर बोलल्या. या मुलाखतीचा एक क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यात तो विधानं करताना म्हणतो की, भारतात खेळाडूंना घरं जाळून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. एवढ्यावरच तो थांबला नाही; पुढे तो म्हणाला की काही खेळाडू तर जन्मापासून “आम्ही हिंदुस्तानी आहोत” हे सिद्ध करत फिरतात आणि आता आशिया कप 2025 मध्ये ते कमेंट्रीही करत आहेत.

शाहिद आफ्रिदी नक्की काय म्हणाला? (What did say Shahid Afridi?)

शाहिद आफ्रिदी म्हणाला, “तिथं खूप समस्या आहेत. त्या खेळाडूंच्या घरांपर्यंत लोकं धकमी द्यायला जातात आणि अगदी घरं जाळण्याच्या धमक्याही मिळतात. काही खेळाडू अजूनही ते हिंदुस्थानी आहेत, हे सिद्ध करत आहेत. हे बिचारे जन्मापासूनच सिद्ध करत आले आहेत की आम्ही हिंदुस्थानी आहोत. आता ते आशिया कपमध्ये जाऊन कमेंट्रीही करत आहेत.”

दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ झाली कमी (India-Pakistan match craze dips in Dubai)

पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर, भारतात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु सरकारने स्पष्ट केले की आम्ही त्यांच्यासोबत कोणत्याही खेळात द्विपक्षीय सामने खेळणार नाही परंतु बहु-संघ स्पर्धांमध्ये (आंतरराष्ट्रीय किंवा आशिया कप स्पर्धा) खेळू. पण, 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्याची क्रेझ चाहत्यांमध्ये पूर्वीसारखी दिसत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, स्टेडियमच्या सर्व स्टँडवर तिकिटे उपलब्ध आहेत, तर यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा दोन्ही संघ दुबईमध्ये भिडले, तेव्हा त्या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली गेली.

हे ही वाचा –

Asia Cup 2025 Team India: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय; टीम इंडियाची सोडली साथ, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.