Asia Cup 2025 – पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने संघाची साथ सोडली

Asia Cup 2025 मध्ये टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली आहे. UAE चा 9 विकेटने पराभव करत हिदुस्थानने पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. आता हिंदुस्थानचा दुसरा सामना रविवारी (14 सप्टेंबर 2025) पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. अशातच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाची साथ सोडली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड सुरू केली आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाज आणि फलदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने एकतर्फी सामना जिंकला. त्यामुळे पुढील सामन्यात सुद्धा हेच 11 खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. अशातच राखीव खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने संघाची साथ सोडत इंग्लंडच्या दिशेने मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टंनला काउंटी चॅम्पियनशिपमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळण्याची ऑफर मिळाली आहे. त्याने ऑफर स्वीकारली असून हॅम्पशायरसाठी तो दोन सामने खेळणार आहे. तसेच हॅम्पशायर क्रिकेट क्लबने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे स्वागत केले आहे.
वॉशिंग्टंन सुंदरने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्श केलं होतं. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित करणारा खेळ केला होता. या मालिकेत त्याने एक शतक ठोकत एकूण 284 धावा केल्या होत्या. तसेच 38.57 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या होत्या. त्याचा हा दमदार खेळ पाहूनच त्याची हॅम्पशायर संघात निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.