Asia Cup: भारत- पाक सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजीचं कौतुक करत शोएब मलिकने दिला पाकिस्तानला इशारा!
आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2025) भारताने मंगळवारी दुबईत झालेल्या आशिया कपमधील पहिल्याच सामन्यात केवळ 58 धावांचा पाठलाग करत यूएईला त्यांच्या घरच्या मैदानावर 9 विकेट्सने पराभूत केले. कुलदीप यादव (4/7) याने घेतलेल्या 4 विकेट्स आणि शिवम दुबे (3/7) याच्या शानदार गोलंदाजीमुळे यूएई संघ 13.1 षटकांत फक्त 57 धावांत बाद झाला. त्यात अलीशान शराफू (22) आणि कर्णधार मोहम्मद वसीम (19) ह्या दोघांनी दहाच्या पुढे धावा केल्या.
भारतासाठी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma & Shubman gill) आणि उपकर्णधार शुबमन गिल यांनी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत फक्त 4.3 षटकांत म्हणजे 27 चेंडूतच लक्ष्य गाठले.
याविषयी बोलताना पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक म्हणाला, खेळाडूंना आत्मविश्वास आणि स्पष्टता दिली गेली. फक्त टॅलेंट असून चालत नाही, त्याला दिशा मिळाली पाहिजे. जर खेळाडूला माहित नसेल की, दोन सामन्यांनंतर त्याला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळायला मिळेल की नाही, तर त्याचा सर्वोत्तम खेळ दिसणार नाही.
आपलं सिस्टीम खेळाडूंना मागे खेचत नाही. कधी अनुभवी खेळाडूंना तर कधी तरुणांना कोणतेही कारण न देता, न सांगता संघाबाहेर बसवलं जातं. मग खेळाडू विरोधी संघाशी झुंजतो की स्वतःच्या जागेबाबत गोंधळतो हेच कळत नाही. त्याच्या मनात भीती असते, मला बाहेर बसवतील पण काहीच सांगितलं नाही. त्यामुळे खूप फरक पडतो. म्हणूनच या ठिकाणी सुधारणा गरजेची आहे.
58 धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी केली. हैदर अलीच्या पहिल्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला, पुढच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून शॉट मारला. काही चेंडू डॉट गेले तरी पुढच्या षटकात त्याने लाँग-ऑफवर अप्रतिम षटकार आणि चौकार मारला.
Comments are closed.