IND vs PAK सामन्याची 50 टक्के तिकिटं शिल्लक, कोणीच खरेदी करेना, 2 खेळाडूंबाबत धक्कादायक दावा;

India vs Pakistan Asia Cup 2025 Match : आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. या काळात स्टेडियममध्ये चाहत्यांची कमतरता पाहून आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चं मनोबल खाली गेलं आहे. 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्यानंतर ACC ने मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, पण या सामन्यातही चाहत्यांची उत्सुकता अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. त्यामुळे या सामन्याच्या अर्ध्या तिकीटांनाही आतापर्यंत विक्री झाली नाही. भारताच्या माजी क्रिकेटपटूने या मागे एक महत्त्वाची कारणं सांगितली आहेत. त्यानुसार, टीम इंडियाच्या दोन दिग्गज खेळाडूंच्या या स्पर्धेत न खेळण्यामुळे चाहती स्टेडियममध्ये आलेले नाहीत.

आकाश चोप्राचा मोठा दावा (Aakash Chopra on India vs Pakistan Asia Cup 2025)

माजी भारतीय क्रिकेटपटू व कमेंटेटर आकाश चोप्राने आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या तिकीटांची विक्री अपेक्षेप्रमाणे न होण्याबाबत आपली मते व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) खेळत नसल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. आतापर्यंत या सामन्याचे फक्त 50% तिकीट विकले गेले आहेत.

आकाश म्हणाला की, “हे दोघे खेळाडू चाहत्यांना प्रचंड आकर्षित करतात. त्यांच नसणे या स्पर्धेवर परिणाम करणारे आहे. जेव्हा विराट रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी गेला होता, तेव्हा स्टेडियम जवळजवळ भरलेले होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.”

विराट आणि रोहित खेळत असते तर…

आकाश चोप्राने सांगितले की, बांगलादेश, भारत आणि अफगाणिस्तान यांनी आशिया कपमध्ये प्रत्येकी एक सामना खेळला आहे, पण अजूनही स्टेडियममध्ये खूप जास्त चाहते दिसलेले नाहीत. हे तिकीट जास्त महाग असल्यामुळे किंवा UAE मध्ये कामाच्या दिवसांमध्ये संध्याकाळी सामनं पाहायला येणं कठीण असल्यामुळे नाही.

आकाश चोप्राने जोर देऊन सांगितले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) उपस्थित असते तर चाहत्यांची संख्या दुपटीने वाढली असती. जसे की, जर आधी 5,000 लोक सामनं पाहण्यासाठी आले असते, तर या दोघांच्या उपस्थितीत किमान 10,000 ते 15,000 लोक स्टेडियममध्ये आले असते. त्यांना वैयक्तिकरित्या पाहण्याची संधी क्वचितच मिळते, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा प्रचंड फरक पडतो.

हे ही वाचा –

Rajat Patidar Century In Duleep Trophy Final Video : फायनलमध्ये कॅप्टन रजत पाटीदारचा सुपरहिट शो! ठोकलं वादळी शतक अन् रचला इतिहास, निवडकर्त्यांना दिला इशारा

Comments are closed.