IND vs PAK: आशिया कपमध्ये भारत–पाक सामना अजूनही रद्द होऊ शकतो का? जाणून घ्या नियम काय सांगतात

भारत आणि पाकिस्तान IND vs PAK) यांच्यात आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मधील सामना रविवारी, 14 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 6:30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता) सुरू होईल. या सामन्याला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना देशात जोरदार चर्चा सुरू आहे. रस्त्यांवरून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र भारत–पाक सामन्याची चर्चा आहे.

पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला देश अजून विसरला नाही. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्या घटनेनंतर आता पहिल्यांदाच भारत–पाक संघ क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे हा सामना रद्द होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

याबाबत बीसीसीआयचं स्पष्ट म्हणणं आहे की, बोर्ड नेहमी सरकारच्या निर्णयानुसारच वागेल. भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध सामन्यांबाबत आधीच नवी धोरणं स्पष्ट केली आहेत. त्या धोरणांनुसार भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास रोखले जाणार नाही.

याच निर्णयामुळे टीम इंडियाला आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हा सामना रद्द होणार नाही, हे स्पष्ट आहे. कारण बीसीसीआय सरकारच्या निर्णयाला बदलू शकत नाही.

सरकारचं म्हणणं असं आहे की, देशाला मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी तयार करण्यात येत आहे. भारतात अशा स्पर्धा आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. भारताला ऑलिंपिक 2036 यजमानपदही मिळवायचं आहे, ज्यामध्ये जगभरातील खेळाडूंना भारतात यावं लागेल.

Comments are closed.