बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार? हरभजन सिंगचं नाव चर्चेत, सौरव गांगुलीही शर्यतीत, 28 तारखेला निवडण
हरभजन सिंग विरुद्ध सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष निवडणूक: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो भारत–पाकिस्तान सामन्याच्या विरोधात बोलताना दिसला होता. आता त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार त्याला बीसीसीआयमध्ये मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. या सभेत बीसीसीआय अध्यक्षासह इतर काही महत्त्वाच्या पदांची निवड केली जाणार आहे.
त्याआधी पंजाब क्रिकेट असोसिएशनने हरभजन सिंगला आपला प्रतिनिधी म्हणून घोषित केलं आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हरभजन सिंग हे एकमेव मोठे नाव नसून भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने नामांकित केले आहे. बोर्ड सर्वोच्च परिषद आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांसाठी नवीन निवडणुका देखील घेणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मुख्य अजेंड्यांपैकी एक म्हणजे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची निवड आणि नियुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेतील सर्वसाधारण सभेच्या एका प्रतिनिधीची आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमधील सर्वसाधारण सभेच्या दोन प्रतिनिधींची निवड आणि नियुक्ती देखील प्रस्तावित आहे.
अनेक माजी क्रिकेटरांशी संपर्क
यावेळी राज्य संघ एखाद्या माजी क्रिकेटरला पुन्हा बोर्ड अध्यक्ष बनवतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सौरव गांगुली 2019 मध्ये बीसीसीआय अध्यक्ष झाले होते, तर 1983 चा विश्वविजेता रोजर बिन्नी ऑक्टोबर 2022 मध्ये निर्विरोध अध्यक्ष झाले होते आणि नुकतेच त्यांनी पद सोडलं. प्रशासनात भूमिका घेण्यासाठी बोर्डातील निर्णायकांनी अनेक माजी भारतीय क्रिकेटरांशी संपर्क साधला होता, पण कुणीही विशेष रस दाखवला नाही.
हरभजन पंजाब क्रिकेट संघाचा सल्लागार
हरभजन सिंगला याआधी पंजाब क्रिकेट असोसिएशनने सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. आता आपल्या मूळ राज्य संघाच्या प्रतिनिधी म्हणून त्याचा हा पहिलाच कार्यकाळ असेल. हरभजनने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळत 417 बळी घेतले आहेत. तसेच 236 एकदिवसीय सामन्यांत त्याने 269 विकेट्स मिळवल्या. तो 2007 चा टी-20 आणि 2011 चा वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.
निवडणुकीचं वेळापत्रक
- प्रतिनिधींच्या नावनोंदणीची अंतिम तारीख – 12 सप्टेंबर
- नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख – 20 ते 21 सप्टेंबर
- उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर
- निवडणूक – 28 सप्टेंबर
गेल्या दहा वर्षांत बीसीसीआयमध्ये मतदान झालेलं नाही. यावेळीही सदस्यांमध्ये चर्चेनंतर एकमतानेच उमेदवार निवडले जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.