करवीर संस्थानचा शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

संपूर्ण देशभरात म्हैसूरपाठोपाठ ऐतिहासिक महत्त्व असलेला कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा शाही दसरा महोत्सव अखेर राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 2023 मध्ये याबाबत घोषणा करूनही गेल्या वर्षी याची अंमलबजावणी न झाल्याने महायुती सरकारवर चौफेर टीका झाली होती.
कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. येथील शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात आहे. म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच लोकप्रिय होत असलेल्या कोल्हापूरच्या दसरा महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण सांस्पृतिक कार्यक्रमाद्वारे आयोजित करण्यात येतात. येथे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवात दर्शनासाठी किमान 30- 40 लाख पर्यटक विविध भागांमधून येत असतात.
n कोल्हापुरात किल्ले पन्हाळगड तसेच श्रीक्षेत्र जोतिबा मंदीर, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य, कणेरी मठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील स्थापत्य कलेसाठी जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदीर आदी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध आहेत. दसरा महोत्सवास राज्याच्या मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूरमध्ये किमान दोन दिवस मुक्कामी राहून दुसऱया दिवशी पन्हाळा किल्ला, नृसिंहवाडी आदी स्थळांना भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.
Comments are closed.