Asia Cup 2025 – ..तर कुलदीपला खेळणे अशक्य

आशिया कपमधील पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने यूएईचा 9 विकेट्सने दणदणीत पराभव केला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक याने हिंदुस्थानी खेळाडू कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांचं जोरदार कौतुक केलं. कुलदीपने केवळ 2.1 षटकांत 7 धावांत 4 विकेट घेतले आणि ‘सामनावीर’ ठरला.

यूएईचा सुरुवातीचा खेळ चांगला होता, पण पुढे त्यांनी कोणतीही योजना आखली नाही. ज्याला ते वाचू शकत नव्हते अशा गोलंदाजावरच आक्रमक फटके मारत राहिले आणि गडय़ांचा पाऊस पडला. हे ठरलेलंच होतं. आम्ही आधीच सांगितलं होतं की यूएईचे फलंदाज वेगवान गोलंदाजांना खेळतील, पण दोन रहस्यमय फिरकीपटूंविरुद्ध म्हणजेच वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्याविरुद्ध ते टिकणार नाहीत. जर तुम्हाला कुलदीप समजला नाही तर त्याला खेळणं अशक्य आहे, असे मिसबाह म्हणाला.

Comments are closed.