कांजूर येथे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्राचे वाटप

शिवसेना विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील महिलांना, महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत यंत्रसामुग्री वाटप तसेच अनुदानप्राप्त लाभार्थी मेळावा कांजूर येथील सहाय्यक एस विभाग कार्यालय येथे पार पडला. यावेळी महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र मशीनचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी महिला बाल कल्याणच्या अधिकारी सरला राठोड यांचे विशेष सहकार्य मिळाले. विभाग संघटक रश्मी पहुडकर तसेच श्वेता पावसकर, वंदना बेंद्रे, सुनीता सांगडे, सुनीता मेहत्रे, सुशीला मंचेकर, लीना मांडलेकर, रजनी पाटील, मनीषा जाधव, मनीषा तारळकर, चारुशीला पाटील, प्रिया गावडे, सचिन चोरमले, रवींद्र महाडिक, राजू पावसकर, दीपक सावंत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments are closed.