Navratri : नवरात्रीत का खेळला जातो गरबा-दांडिया?

दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीत भाविक मनोभावे देवीची पूजा करून उपवास करतात. यंदा 22 सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे. आता नवरात्र म्हटले की गरबा, दांडिया आवडीने खेळला जातो. वास्तविक गरबा आणि दांडिया या खेळांचा उगम गुजरातमधून झाला, असे सांगितले जाते. पण, गरबा आणि दांडिया नवरात्रीतच का खेळला जातो. तुम्हाला यामागचे कारण माहिती आहे का? जाणून घेऊयात सविस्तरपणे याचे उत्तर

धार्मिक कारणे –

अंबे मातेने महिषासुराचा वध केला होता, अशी आख्ययिका आहे की, त्यामुळे महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले होते आणि या नृत्याला ‘गरबा’ किंवा ‘दांडीया’ असे नाव पडले. त्यामुळे नवरात्रीत देवीची स्थापना केल्यावर भाविक मोठ्या श्रद्धेने हे नृत्य करतात.

गरबा-दांडियाचे धार्मिक महत्त्व –

  • पारंपारिक रूपात गरबा म्हणजे एक मातीचे भांडे. ज्याच्या आत एक दिवा लावण्यात येतो. ज्याला गुजराती भाषेत ‘गरबी’ असे म्हटले जाते.
  • आपण बारकाईने पाहिले तर गरबा हा मातीच्या भांड्याच्या सभोवती केला जातो. ज्याला ‘गर्भ दिप’ म्हटले जाते.
  • गर्भदिप हे स्त्रिच्या सर्जनशक्तीशी संबधित आहे. याच गरब्याच्या माध्यमातून शक्तीची पूजा केली जाते.
  • गरबा गोलाकार करण्यात येतो. यामागचे कारण म्हणजे गोलाकारात सादर केलेला गरबा जीवनाच्या वर्तूळाचे प्रतीक असते.
  • गरबा खेळताना तीन टाळ्या वाजवल्या जातात. तीन टाळ्या या त्रिदेवाला समर्पित करण्यात आल्या आहेत.
  • दांडिया खेळामध्ये महिला आणि पुरूष दोघेही रंगबेरंगी दांड्याचा वापर करतात.
  • कृष्णाने राधा आणि गोपीसंह रासक्रीडा केली होती. याच रासक्रीडेची आठवण म्हणून महिला आणि पुरूष दांडिया खेळतात.
  • दांडिया हा नृत्यप्रकार दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचं प्रतीक सांगितले जाते. त्यामुळे तलवारींऐवजी रंगीबेरंगी काठ्या घेऊन नाचण्यात येते.

गरबा आणि दांडिया यातील फरक काय?

गरबा – गरबा नृत्य हे देवीची आरती करण्याआधी केले जाते.

दांडिया – दांडिया देवीच्या आरतीनंतर करण्यात येते.

हे ही वाचा – Shardiya Navratri 2025: यंदा नवरात्री असणार खास; नऊ नव्हे दहा दिवसांचा उत्सव, पण कारण काय?

Comments are closed.