माजी मंत्री प्रफुलला कुमार मलिक यांना बीजेडीमधून निलंबित केले

भुवनेश्वर:

बिजू जनता दलाने शुक्रवारी ओडिशाचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल कुमार मलिक यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. क्षेत्रीय संघटन योग्यप्रकारे काम करत नसल्यास मी पक्ष सोडू शकतो, असे वक्तव्य मलिक यांनी गुरुवारी केले होते. विशेष म्हणजे मलिक हे बिजद अध्यक्ष नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. प्रफुल्ल कुमार मलिक यांना पक्षविरोधी कारवायांप्रकरणी तत्काळ प्रभावाने बिजू जनता दलातून निलंबित केले जात असल्याची माहिती पक्षाचे उपाध्यक्ष प्रताप जेना यांनी एका आदेशाद्वारे दिली. ही कारवाई काही नेत्यांच्या नाराजीदरम्यान झाली आहे. पक्षाचे नेते एन. भास्कर राव आणि लालबिहारी हिमिरिका यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला रामराम ठोकला होता. तर मलिक यांनीही पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते.

Comments are closed.