अभिनेता विजय केवळ आठवड्याच्या शेवटी सक्रिय आहे!
भाजप नेते अण्णामलाई यांच्याकडून टीव्हीके संस्थापक लक्ष्य
वृत्तसंस्था/ चेन्नई
भाजप नेते के. अण्णामलाई यांनी टीव्हीके या पक्षाचे संस्थापक आणि अभिनेता विजय यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. अभिनेता-राजकीय नेता विजय स्वत:चा पक्ष टीव्हीकेला द्रमुकचा पर्याय ठरवू शकत नाही, कारण तो केवळ विकेंडमध्येच राजकीय स्वरुपात सक्रीय होतो. राजकारणात पूर्णवेळ ऊर्जेची आवश्यकता असते. भाजप नेते आणि कार्यकर्ते पूर्ण वर्ष सक्रीय स्वरुपात मैदानात उतरलेले असतात. केवळ भाजपच द्रमुकला पर्याय असल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला. अण्णाद्रमुकचे नेते एडप्पादी के. पलानिस्वामी राज्यभरात सक्रीयपणे फिरत आहेत आणि विविध जिल्ह्यांमध्ये सभांना संबोधित करत आहेत. तर विजय केवळ विकेंडमध्येच सक्रीय होतात. राजकारणाला गांभीर्याने घ्यावे आणि दैनंदिन स्वरुपात यात सामील व्हायला हवे असे वक्तव्य अण्णामलाई यांनी केले.
तमिलगा वेत्री कषगम एक पर्यायी शक्ती होऊ इच्छित असल्यास त्याने राजकारणाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परंतु विजय शनिवार आणि रविवारीच लोकांना भेटतात, यामुळे लोक रालोआला द्रमुकचा पर्याय मानत असल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला.
टीव्हीकेची आज बैठक
विजय यांचा पक्ष टीव्हीके शनिवारी मरक्कदाई येथे बैठक घेणार आहे. येथूनच विजय पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वत:ची प्रचारमोहीम सुरू करणार आहे. पोलिसांनी अनेक बंधने घालत बैठकीला मंजुरी दिली आहे. कार्यक्रम केवळ 25 मिनिटांचा असेल, कार्यक्रमस्थळाच्या मार्गात कुठलाही रोड शो किंवा स्वागत सोहळ्याची अनुमती नसेल. प्रचार केवळ तिरुचिरापल्लीतच केला जाणार आहे.
Comments are closed.