अमेरिकेत भररस्त्यात हिंदुस्थानी व्यक्तीचे शीर उडवले

अमेरिकेतील डलासमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची क्षुल्लक कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रमौली नागमल्लैया असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 50 वर्षांचे होते. मूळचे हिंदुस्थानी असलेले चंद्रमौली यांची त्यांची पत्नी आणि मुलाच्या डोळय़ांसमोरच अमेरिकन व्यक्तीने कुऱ्हाडीने मानेवर सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी टेक्सासमधील डलासमधील डाऊनटाऊन सूट्स मोटलमध्ये घडली आहे. डलास पोलिसांनी या हत्या प्रकरणात आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला अटक केली आहे. चंद्रमौली नागामल्लैया हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत मोटलमध्ये होते. तेव्हा त्यांनी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ आणि त्याची साथीदार महिलेला खराब वॉशिंग मशीन वापरू नका असे सांगितले. यावर योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला राग अनावर झाला आणि त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता चंद्रमौली यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले.
कार्यक्रम सीसीटीव्हीत उत्पन्न
ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये दिसतेय की, मार्टिनेजने चंद्रमौली यांच्या मानेवर सपासप वार करून डोके आणि धड वेगळे केले. धडापासून डोके वेगळे केल्यानंतर मार्टिजने फुटबॉल खेळतात तसे त्या डोक्याला लाथेने मारले. नंतर ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. मार्टिनेजने गुन्हा कबूल केला असून त्याला डलास काऊंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
Comments are closed.