मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा;फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं

Devendra Fadnavis On मराठी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद निर्माण झालाय. साडेचार लाख लोकसंख्या आणि सुमारे 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी तर अन्य महापालिकांध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबतची कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी नगरविकास विभागास दिले आहेत.

ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशांमुळे शिंदे नाराज असल्याची माहिती समजतेय. राज्यात ड वर्गाच्या 19 महापालिका आहेत. मात्र या आदेशांवर स्वतः देवेंद्र फडणवीसांना स्पष्टीकरण दिलं आहे. महापालिकांमध्ये केवळ आयएएस राहतील असं ठरलेलं नाही. जिथे आयुक्तांच्या जागा आयएएस नोटिफाईड आहेत, तिथे आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास केंद्राकडून आयएएसच्या जागा कमी केल्या जातात असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? (What exactly Devendra Fadnavis say?)

महापालिकांमध्ये केवळ आयएएस राहतील असं ठरलेलं नाही. ज्या ठिकाणी महानगर पालिकेच्या कमिशनरच्या जागा आहेत. या आयएएस करता आरक्षित आहेत.  आरक्षित म्हणजे नोटीफाईड आहेत. त्या ठिकाणी जर आपण आयएएस अधिकारी दिला नाही. तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या आयएएसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये?, आयएएसकरता नोटीफाय जागांना जर तुम्ही आयएएस अधिकारी देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला इतक्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकत्ता नाही. म्हणून अशा नोटीफाईड ठिकाणी आयएएस अधिकारीच दिला गेला पाहिजे असा आमचा आग्रह आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी- (Dissatisfaction between Devendra Fadnavis and मराठी)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. याआधीच्या अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे. तर 19 ड वर्गाच्या महानगरपालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी  अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यानंतर आता नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

https://www.youtube.com/watch?v=todbzz-bkmu

संबंधित बातमी:

मराठी And Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी?; मुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिल्याने ‘भाई’ नाराज, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.