सूर्या आपला हुकमी एक्का बाहेर काढणार; चक्रवर्तीचा पत्ता कट? जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11

भारत इलेव्हन विरुद्ध पाकिस्तान एशिया कप 2025 खेळत आहे: आशिया कप 2025 मधील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपापला पहिला सामना जिंकला आहे. भारताने यूएईवर दणदणीत विजय मिळवला, तर पाकिस्तानने ओमानला हरवत खाते उघडले.

पाकिस्तानविरुद्ध सूर्या आपला हुकमी एक्का बाहेर काढणार

हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर-4 कडे झेप घेईल, तर हरलेला संघ पुढच्या लढतीत सर्वस्व पणाला लावणार आहे. भारताने यूएईविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह या एकाच वेगवान गोलंदाजाला संधी दिली होती. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत अर्शदीप सिंगची पुनरागमनाची शक्यता प्रबळ आहे.

अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती कुणाचा पत्ता कट होणार?

यूएईविरुद्ध सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या जोडीने तीन फिरकीपटूंवर विश्वास दाखवला होता, ज्यामध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती होते. त्यात कुलदीपने अफलातून कामगिरी करत चार विकेट घेतले होते. त्यामुळे त्याला बाहेर बसविण्याचा प्रश्नच नाही. आता अर्शदीपला जागा देण्यासाठी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांपैकी एक बाहेर जाणार हे निश्चित आहे. अक्षर पटेल खालच्या फळीत फलंदाजीचा चांगला पर्याय ठरतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला ठेवण्याकडे झुकलेले दिसते. त्यामुळे वरुण चक्रवर्तीला बाहेर केल्या जाऊ शकते.

जर अक्षरला बाहेर बसवले गेले तर भारताच्या फलंदाजीची खोली कमी होईल आणि वरच्या क्रमावर अधिक दबाव येईल. म्हणूनच पाकिस्तानविरुद्ध अर्शदीपच्या समावेशासाठी वरुणलाच बाजूला व्हावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

पाकिस्तानविरुद्ध ही असू शकते भारताची खेळणे -11 : (भारत इलेव्हन विरुद्ध पाकिस्तान एशिया कप 2025 खेळत आहे)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल/वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्नाधर), शुबमन गिल, हार्दिक पांड्या, अरशदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

पाकिस्तानचे संघटना: सलमान आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हरीस राउफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यशक), मोहम्मद नवाझ, मोहम्मद नवाज, शमनसुब, शीबहाद अफरीदी, सुफन शाह शाह.

हे ही वाचा –

Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार? मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, काही तासाआधी मोठी अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.