Maharashtra Political Rift | अजित दादांचा ‘गुलाबी’ जनसंवाद, CM-DCM मध्ये नाराजीची चर्चा
पुण्यातल्या हडपसर मतदार संघात अजित पवार यांच्या जनसंवाद उपक्रमाची सुरुवात झाली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस सहआयुक्त उपस्थित होते. प्रशासनाच्या एकोणीस स्टॉल्सची उभारणी झाली. या उपक्रमाचे नियोजन अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या डिजाईन बॉक्स कंपनीकडून झाले. फ्लेक्स, अजित पवार यांचे जॅकेट आणि प्रत्येक स्टॉलचा रंग गुलाबी होता, त्यामुळे हा शासनाचा उपक्रम की अजित पवार यांचे प्रमोशन, असा प्रश्न उपस्थित झाला. कुरुडू गावातील मुरुम उपसा प्रकरणी अहवालातून बेकायदेशीर उपसा समोर आला. यावर अजित पवार यांनी ‘प्रकरणामध्ये काय ते सरकार बघून घेईल, त्याबद्दल नो कमेंट,’ अशी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून नाराजीची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला सनदी अधिकारी नियुक्त करण्याबाबत कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश दिले. यावर अजित पवार यांनी ‘माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे, कुठेही वाद नाही,’ असे स्पष्ट केले.
Comments are closed.