IND vs PAK: आकडेवारीतही भारतापुढे पाकिस्तान कमकुवत, सामन्यापूर्वी जाणून घ्या हेड-टु-हेड रेकॉर्ड!
सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया रविवारी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे (IND vs PAK). यावेळी भारताचा प्रयत्न असेल की पाकिस्तानला या सामन्यात चांगल्या फरकाने मात द्यावी. आतापर्यंत आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताने पाकिस्तानला तब्बल 10 वेळा पराभूत केले आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर स्पष्ट होते की, पाकिस्तान भारतासमोर टिकू शकत नाही, आणि रविवारीही अशीच परिस्थिती दिसू शकते.
भारताने आपल्या स्पर्धेची सुरुवात यूएईला फक्त 5 षटकांत हरवून केली, तर पाकिस्तानला ओमानसारख्या कमकुवत संघाविरुद्ध विजय मिळवायला तब्बल 17 षटके लागली. आता 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जेव्हा दोन्ही संघ भिडतील, तेव्हा पाकिस्तान पुन्हा एकदा नामोहरम होऊ शकतो.
आशिया कपचे आतापर्यंत 16 हंगाम पूर्ण झाले आहेत. यात वनडे आणि टी20 या दोन्ही फॉरमॅट्सचा समावेश आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांची 18 वेळा आमनेसामने भिडंत झाली आहे. यात भारताचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. टीम इंडियाने 18 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर पाकिस्तानला फक्त 6 वेळा यश मिळाले. याशिवाय दोन सामने बरोबरीत सुटले.
फक्त एवढंच नाही, तर आशिया कपच्या इतिहासात टीम इंडिया ही सर्वात यशस्वी टीम ठरली आहे. भारताने हा किताब तब्बल 8 वेळा जिंकला आहे, तर पाकिस्तानला फक्त दोन वेळा यश मिळालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांनी हा किताब 6 वेळा जिंकला आहे.
Comments are closed.