अर्ध्याहून अधिक मंत्री आका, तर फडणवीस हे मोठे आका, बच्चू कडूंचा हल्लाबोल, मोदींवरही टीका
बॅचू कडू: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानंतर मणिपूरला गेले आहेत. हा नेपाळचा परिणाम आहे. नरेंद्र मोदी यांना भीती वाटत आहे की आपलं घर जळू नये. स्वतःच्या घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण आली आहे दुसरं काही नाही असे म्हणत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी टीका केली. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. मंत्रीमंडातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत अशी टीका त्यांनी केली.
पिक विमा कंपन्या फसव्या, देशामध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा
पीक विम्याचे निकष बदलले आहेत, या प्रश्नावर बच्चू कडू यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याच्या मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत तर फडणवीस मोठे आता आहेत असं म्हणत फडणवीस यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांनी पिक विमा काढू नये, गुजरातमध्ये या कंपन्या फीरकत सुद्धा नाहीत. पिक विमा कंपन्या फसव्या आहेत असे कडू म्हणाले. या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळं सर्व केंद्रीयकरण झालेलं आहे असे कडू म्हणाले.
काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रीपद घेतात, सर्वांचे मोठे आका देवेंद्र फडणवीस आहेत असे कडू म्हणाले.
बच्चू कडू यांची सध्या शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा सुरु
बच्चू कडू हे सध्या शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा काढत आहेत. जिल्हानिहाय दौऱ्यावेळीते सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रश्नावरुन बच्चू कडू हे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनो, आपण पेटून उठूया.. आपल्या हक्कासाठी लढूया असं आवाहन ते करत आहेत..
महत्वाच्या बातम्या:
Bacchu Kadu : देवेंद्रजी तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं, मात्र…; बच्चू कडूंचा सडकून प्रहार
आणखी वाचा
Comments are closed.