विराट कोहलीचा मोठा आदर! शमीच्या आईच्या पायांना केला स्पर्श, जाणून घ्या खरं कारण
चॅम्पियन्स ट्रॉफी (2025) जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेल्या मोहम्मद शमीने संघासाठी जोरदार गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील लोकप्रिय शो ‘आप की अदालत’ मध्ये शमीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे. या शो मध्ये मोहम्मद शमीला विचारले की स्टार फलंदाज विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या आईचे पाय का स्पर्श केले? यावर त्याने अगदी स्पष्टपणे उत्तर दिले आहे.
शमी म्हणाला “विराट माझ्या आईशी फोनवर बोलत असे, पण त्यांची कधी व्यक्तिगत भेट झाली नव्हती. माझं कुटुंब क्वचितच सामना पाहायला येतं. तब्बल 7-8 वर्षांनी आई स्टेडियममध्ये आली होती. मी विराटला सांगितलं की आई आली आहे. त्यानंतर विराटनं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पायांना स्पर्श केला. तीच ती फोटोतील घटना आहे.”
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, मोहम्मद शमीने भारतीय क्रिकेटसाठी एकूण पाच सामने खेळले आणि ९ विकेट्स घेतल्या. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 53 धावा देऊन पाच विकेट्स घेणे होती. त्याने विरोधी फलंदाजांना खूप त्रास दिला.
शो मध्ये मोहम्मद शमीला विचारले की 2015 च्या विश्वचषकापूर्वी त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तरीही तो इंजेक्शन घेतल्यानंतरही सामना खेळला होता. यावर मोहम्मद शमी म्हणाला की आम्ही आमच्या फिजिओशी मोकळेपणाने बोललो. माझ्या गुडघ्याच्या स्थितीबद्दल सर्वांना माहिती होती आणि माझी कार्टिलेज सर्जरी झाली होती. माझ्या गुडघ्याच्या हाडात क्रॅक होता. ऑस्ट्रियामध्ये साडेचार महिने घालवल्यानंतर मला मालिकेसाठी घरी परतावे लागले.
Comments are closed.