IND vs PAK: हॉटस्टार किंवा स्टार स्पोर्ट्स नाही…या ठिकाणी फ्रीमध्ये पाहा इंडिया वर्सेस पाकिस्तान सामना

आशिया कप 2025 मधील सर्वात मोठा सामना आज रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सहावा सामना आज म्हणजेच रविवार, 14 सप्टेंबर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर टॉस 7.30 वाजता होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट सुपर-4 फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता असल्याने या सामन्याकडे प्रचंड उत्सुकता आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतात IND vs PAK सामन्यांवर बहिष्काराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ब्रॉडकास्टर्सने सामना दाखवणार नाही अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांना हा सामना टीव्ही आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून पाहता येणार आहे.

भारत–पाकिस्तान सामन्याचे थेट प्रसारण Sony Sports नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्स वर हा सामना फ्रीमध्ये उपलब्ध असेल. ऑनलाइन पाहण्यासाठी चाहत्यांना SonyLIV अॅप वापरता येईल, परंतु यासाठी सब्स्क्रिप्शन आवश्यक आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून संघात शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांसारखे दमदार खेळाडू आहेत. पाकिस्तानकडून कर्णधारपदाची जबाबदारी सलमान आगाकडे असून शाहीन अफरीदी, फखर जमन, मोहम्मद हारिस, हारिस राऊफ यांसारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत.

भारताविरुद्ध पाकिस्तान संघ (आशिया चषक 2025)

भारतीय संघ

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा

पाकिस्तान युनियन

सैम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (यशिरक्षक), फखर जमण, सलमान आघा (कर्नाधर), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहिन अफ्रीदी, सुफियान म्यूक, अब्रार अहमद, हुसील, हुसान मोहम्मद वसीम ज्युनार, सलमान मिरज

Comments are closed.