श्रीलंकेच्या विजयामुळे आशिया कप पॉइंट टेबलमध्ये गोंधळ; 'हे' 2 संघ धोक्यात

चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने आशिया कप 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. त्यांनी स्पर्धेतील 5 व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला. श्रीलंकेच्या या विजयामुळे ग्रुप-ब ची पॉइंट्स टेबल खूपच रोमांचक झाली आहे. हाँगकाँगनंतर आता बांगलादेशलाही स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. श्रीलंका आता अफगाणिस्तानसह ग्रुप-ब च्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये आहे. त्याच वेळी, भारत-पाकिस्तान संघ ग्रुप-अ मध्ये टॉप-2 मध्ये आहेत. आतापर्यंत कोणताही संघ सुपर-4 साठी पात्र ठरलेला नाही.

ग्रुप-ब च्या पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकली तर, बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेव्यतिरिक्त, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचेही ग्रुप-ब मध्ये 2-2 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे, अफगाणिस्तान पहिल्या स्थानावर आहे तर बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे.

जर आपण ग्रुप-अ वर नजर टाकली तर भारत आणि पाकिस्तानची येथे मजबूत पकड आहे. पहिल्या सामन्यात युएईला हरवल्यानंतर भारत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ओमानला हरवले आणि कमी नेट रन रेटमुळे दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रुप-ब मध्ये सुपर-4 साठी कोणतीही लढाई नाही.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 11 धावांत 3 विकेट गमावल्या, तर अर्धा संघ 53धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, झकार अली (41) आणि शमीम हुसेन (42 ) यांनी सहाव्या विकेटसाठी 86 धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला निर्धारित 20 षटकांत 139 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, श्रीलंकेने 14.4 षटकांत या धावसंख्येचा पाठलाग केला आणि सहज विजय मिळवला. श्रीलंकेकडून, कामिल मिशराने 32 चेंडूंत नाबाद 46 धावा केल्या, त्याला या डावासाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Comments are closed.