माझी मुलं आयात निर्याताचा व्यवसाय आणि तांदळाची गिरणी चालवतात, इथेनॉल वादावरून नितीन गडकरी यांचे विधान

इथेनॉल वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले, “माझ्या डोक्याची किंमत महिन्याला 200 कोटी रुपये इतकी आहे. माझ्याकडे पैशांची कधीही कमतरता नाही आणि मी कधी खाली पडत नाही.” तसेच माझे काम आणि प्रयोग हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असतात, जास्त कमाईसाठी नव्हे.

गडकरी म्हणाले की, “माझंही एक कुटुंब आणि घर आहे. मी संत नाही, मी देखील एक राजकारणी आहे. पण मला नेहमी वाटतं की विदर्भात 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं ही लाजिरवाणी बाब आहे. आपले शेतकरी समृद्ध होईपर्यंत आपण थांबणार नाही.

नितीन गडकरी यांनी आपल्या मुलाच्या व्यवसांयाविषयी सविस्तर बोलताना सांगितले की ते त्याला फक्त नवे-नवे विचार देतात. त्यांनी म्हटले, “माझ्या मुलाचा आयात-निर्यात व्यवसाय आहे. त्याने अलीकडेच इराणमधून 800 कंटेनर सफरचंद आयात केले आणि इथून 1 हजार कंटेनर केळी पाठवली. माझा मुलगा गोव्याहून 300 कंटेनर मासळी घेऊन सर्बियाला पोहोचला. त्याने ऑस्ट्रेलियात मिल्क पावडर बनवणारा कारखानाही उभारला आहे. तो अबू धाबी आणि इतर ठिकाणी 150 कंटेनर पाठवतो असेही गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी सांगितले की माझा मुलगा आयटीसीसोबत मिळून 26 तांदळाच्या गिरण्या चालवतो. मला पाच लाख टन तांदळाच्या पिठाची गरज असते, म्हणून तो गिरण्या चालवतो आणि मी त्याच्याकडून पीठ विकत घेतो, अशी माहिती गडकरी यांनी दिली

नितीन गडकरी म्हणाले की त्यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी पैशाने चालवलेले एक अभियान राबवले जात आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सर्व काही पारदर्शक आहे. इथेनॉल मिश्रण हे आयातीचा पर्याय आहे, खर्चिकदृष्ट्या परवडणारे आहे, प्रदूषणमुक्त आहे आणि पूर्णपणे स्वदेशी आहे असेही गडकरी यांनी सांगितले.

Comments are closed.