लातूर हादरलं ! कॉलेजमध्ये मैत्री, तरुणीला विश्वासात घेत लॉजवर नेले, शरीरसंबंधाच्या मागणीला नकार

व्यापक गुन्हा: लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 24 वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधांची मागणी केली. तरुणीने नकार देताच जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचे नाव किरण विठ्ठल सूर्यवंशी असे आहे .

मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यासह राज्यभरातून अशा घटना वारंवार समोर येत आहेत . शिक्षणासाठी राज्यातील व राज्य बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे .वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे . पोलिसांनी गेल्या काही महिन्यांमध्ये समुपदेशन करून जवळपास 180 मिसिंग केस असलेल्या मुलींना परत त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिलेले आहे .

नेमकं घडलं काय ?

उदगीर येथील एका नामांकित महाविद्यालयात आरोपी तरुण आणि तरुणी शिक्षण घेत होते . यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली . आरोपी तरुणाने एक दिवस तरुणीला विश्वासात घेत शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉजवर नेले . तू मला खूप आवडतेस तुझ्यासोबत लग्न करायचे आहे तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू दे अशी मागणी तरुणाने तरुणीकडे केली .आपण भविष्यात लग्न करू आपला सुखाचा संसार थाटू असे सांगितले .तू माझ्यासोबत शरीर संबंध ठेव असा वारंवार तगादा लावला. तरुणीने नकार देताच शरीर संबंध ठेव नाहीतर तुझा जीव घेईन अशा शब्दात धमक्या देण्यास त्याने सुरुवात केली . त्यानंतर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले .ही बाब कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी ही तरुणाने पीडित तरुणीला दिली . काही दिवसांनी पीडित मुलीने ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर शनिवारी (13 सप्टेंबर ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बारमध्ये बिअरचे बिल भरण्याच्या बदल्यात फाईलवर सही

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नाजा येथील तलाठ्याने एका फाईलवर सही करण्यासाठी बियरबारचे बिल भरण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जैनपूर कोठारा गावातील विकलांग असलेल्या महिलेने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज केला होता. मात्र अर्जावर तलाठी सही करत नसल्यामुळे गावातील एका युवकाने  तलाठ्याला गाठून सही करण्याची विनंती केली, मात्र तलाठ्याने पैशाची मागणी करत हॉटेलचे बिल दिल्याशिवाय सही करणार नसल्याचं सांगितलं. हा सर्व प्रकार गावातील तरुणाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.