मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग

>>

आज सकाळी आपल्याच मनाचा शोध घ्यावा वाटला. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.’ मन प्रसन्न करण्याचे अनेक बाह्य मार्ग आपण शोधत असतो. अगदी सुगंधी फुलांचा सभोवताली सडा असावा, अत्तराचे दिवे उजळावेत, सुंदर रेशमी वस्त्र परिधान करावीत असं रम्य वातावरण निर्माण करूनही कधी-कधी मन प्रसन्न होत नाही. म्हणजे सभोवतालचे वातावरण प्रसन्न आहे म्हणून नाही मन प्रसन्न होत. मग मन कसं करायचं प्रसन्न? …तर अंतरिक भाव जेव्हा प्रसन्न असतील तेव्हाच आपण म्हणू की, आपलं मन प्रसन्न आहे किंवा आपण आनंदी आहोत. पण हे मन प्रसन्न करण्याचा मार्ग आहे का? असा विचार करताना एकदम मनात आले ते लहानपणी घोकून पाठांतर केलेले रामदासांचे मनाचे श्लोक. या 205 श्लोकांत रामदासांनी मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग सांगितलाय असं मला वाटतं. मनातले विचार शुद्ध झाले, मनातील किल्मिषे दूर झाली तर उदास करणारे, नैराश्य आणणारे विचार येणं बंद होतील. मन आनंदी, प्रसन्न राहील. मनाच्या श्लोकातील एक एक श्लोक समोर ठेवू या आणि तो मार्ग कसा आचरणात आणायचा ते पाहू या. भेटू या पुढल्या भागात.

Comments are closed.