Asia Cup: टीम इंडियाचे 2 खेळाडू संपूर्ण पाकिस्तान संघावर भारी! जाणून घ्या आकडेवारी काय सांगते?
आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) सगळ्यात मोठा सामना आज रात्री दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाने यूएईला फक्त 27 चेंडूत पराभूत केले. इतिहास सांगतो की, जेव्हा या दोन्ही टीम्स एकमेकांविरुद्ध मैदानावर उतरतात, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो आणि यावेळीही गोष्ट काही वेगळी होणार नाही.
आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व गाजवले आहे, दुबईत आजच्या रात्री सुद्धा पाकिस्तानसाठी टीम इंडियाचे मोठे आव्हान असेल. भारतीय संघातील फक्त 2 खेळाडू पाकिस्तानला हतबल होण्यास भाग पाडू शकतात.
हे खेळाडू म्हणजे कुलदीप यादव (Kuldeep yadav & Varun chakrawarthy) आणि वरुण चक्रवर्ती. मागील काही काळात वरुण जगभरातील फलंदाजांसाठी एक अवघड चॅलेंज ठरला आहे. मागील 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 12 विकेट घेतल्या आहेत, ज्यात एक फाइव विकेट हॉलदेखील समाविष्ट आहे. वरुण एकटा पाकिस्तानच्या फलंदाजीवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता राखतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याने सर्व संघांच्या फलंदाजांवर कहर टाकला होता. यूएईमध्ये खेळताना त्याने 3 सामन्यात 9 विकेट मिळवल्या होत्या.
वरुणपेक्षा पाकिस्तानसाठी आणखी मोठा धोका म्हणजे कुलदीप यादव (Kuldeep Yadav). यूएईविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात कुलदीपने 4 विकेट घेतल्या होत्या. त्याचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड नेहमीच जबरदस्त राहिलं आहे. टी-20 मध्ये कुलदीपला पाकिस्तानविरुद्ध फार खेळण्याची संधी मिळाली नाही, पण 7 वनडे सामने खेळताना त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलदांजी सरासरी 14 आणि इकॉनॉमी फक्त 3.88 आहे.
भारतीय संघासाठी चांगली बातमी म्हणजे कुलदीप टी-20 स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये परत आला आहे. आता जर वरुण आणि कुलदीपच्या जोडीने जादू दाखवली, तर पाकिस्तानच्या फलंदाजांना दुबईत प्रत्येक धावेसाठी खूप मेहनत करावी लागेल.
Comments are closed.