IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला तर काय होईल? ACC चा मोठा नियम जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आज आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेमध्ये सामना होणार आहे. काही वेळातच या सामन्याला सुरुवात होईल. सोशल मीडियावर बहुतांश भारतीय फॅन्स हा सामना बॉयकॉट करत आहेत. मात्र, भारत सरकार आणि BCCI यांनी टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची परवानगी दिली आहे. तरीदेखील, टीमकडे अजूनही न खेळण्याचा पर्याय आहे. जर त्यांनी असं केलं, तर आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या नियमांचा थेट परिणाम सामन्याच्या निकालावर होऊ शकतो.

पाकिस्तानविरुद्धचा सामना अगदी जवळ आला आहे, पण काही कारणास्तव जर BCCI किंवा भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला, तर त्याचा सरळ फायदा पाकिस्तानला होईल. नियमांनुसार असा सामना फोरफिट मानला जाईल आणि पाकिस्तानला 2 गुण दिले जातील. म्हणजेच पाकिस्तानला थेट फायदा होणार. सुपर-4 मध्ये देखील जर टीम इंडियाने खेळायला नकार दिला, तर तेथेही पाकिस्तानलाच विजेता घोषित केले जाईल.

Comments are closed.