माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांत हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू

जलगाव गुन्हेगारीच्या बातम्या: जळगावच्या (Jalgaon) बिलवाडी गावात जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही कुटुंबांतील एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ विषयातून हाणामारी झाली आहे.आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हा रुग्णालयात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु

गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून बाचाबाची केली होती. त्यानंतर आज रविवारी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि माझ्याकडे पाहून का थुंकला” या कारणावरून वाद चिघळला. लाकडी दांडे, पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला आहे.

जखमींमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश

जखमींमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत रुग्णालयात संताप व्यक्त केला. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. रुग्णालयात गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही कुटुंबामध्ये वाद होते. अखेर आज या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. एकनाथ गोपाळ असं मारहाणीत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लाकडी दांडे, पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली आहे.

किरकोळ कारणावरुन झाला वाद

दरम्यान, किरकोळ कारणावरुन या दोन्ही कुटुंबात वाद झाला आहे. माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ विषयातून दोन्ही कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली आहे.या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. या घटनेनंतर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.