IND vs PAK: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताला फायदा! दुबईत टीम इंडियाचा विजय निश्चित?
आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025 भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील रोमांचक सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगाने (Salman Aaga) टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टॉस जिंकूनही त्यांना फायदा होणार नाही. महासामन्यात भारताने आपली प्लेइंग 11 बदलली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 3 फिरकीपटूंसह सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
दुबईच्या मैदानावर टॉस जिंकून आधी फलंदाजी करणाऱ्या टीमचा अनुभव फारसा चांगला नाही. या मैदानावर आधी फलंदाजी करणारी टीम शेवटची वेळ 2018 मध्ये जिंकली होती. त्यानंतर रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात आधी फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही संघाला विजय मिळाला नाही. टॉस जिंकून आधी फलंदाजी करणाऱ्या संघाने 12 सामन्यांत पराभव पत्करला आहे. तर, आधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला 21 सामन्यांत विजय मिळाला आहे. म्हणजेच, कर्णधार सलमान आगाला स्वतःच्या निर्णयामुळे फायदा होणार नाही असे दिसत आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा सर्वात धोकादायक गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep singh) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलेले नाही. भारताने महासामन्यात 3 फिरकीपटूंसह सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांवर संघ व्यवस्थापनाचा पूर्ण विश्वास आहे. यूएईविरुद्ध जिंकलेल्या 11 खेळाडूंवर भारतानेच विश्वास ठेवला आहे. पाकिस्ताननेही आपली टीम बदलली नाही.
Comments are closed.