जा आणि त्या 26 कुटुंबांना सांगा की या सामन्यातून तुम्ही का पैसे कमवताय, आदित्य ठाकरे सोनी स्पोर्ट्सवर संतापले

आशिया कपमध्ये टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये सामना होत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. सोनी स्पोर्ट्सने सामन्याच्या आधी ‘Our Sunday Night special!’ (रविवारचा आमचा खास बेत) अशा आशयाने या सामन्याची जाहिरात पोस्ट करत लोकांना सोनी स्पोर्ट्सवर सामना पाहण्याचे आवाहन केले आहे. ती पोस्ट रिपोस्ट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोनी स्पोर्ट्सला फटकारले आहे.

”दहशतवाद्यांना पोसणाऱ्या संघासोबत क्रिकेटचा सामना खेळणे व त्यातून पैसा कमावणे हे अत्यंत किळसवाणं आहे. तुमच्या ‘Our Sunday Night special!’ मधून तुम्हाला पैसा का कमवायचा आहे हे पहलगाम हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या नातेवाईकांना सांगा”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

Comments are closed.