Asia Cup: पाकिस्तानच्या बहिष्कारामुळे भारतात आशिया कप इतकी वर्ष आयोजित होऊ शकला नाही, जाणून घ्या सविस्तर!

आशिया कपचे (Asia Cup 2025) वेळापत्रक जाहीर होताच, करोडो भारतीय चाहत्यांमध्ये एक वर्ग पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या निर्णयावर खूपच नाराज झाला. या वर्गाने वेळापत्रक जाहीर होताच आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याची मागणी सुरू केली. आणि जेव्हा भारत-पाकिस्तान सामन्याची पूर्वसंध्या आली, तेव्हा काही प्रमाणात सामन्याचा बहिष्कार करा ही चर्चा सुरू झाली. या आंदोलनात दिग्गज हरभजन सिंगसह (Harbhajan Singh) अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला.

भारताची गोष्ट सांगायची झाल्यास, 1886 मध्ये श्रीलंका येथे झालेल्या विश्वचषकात भारत खेळला नाही. हा एकमेव प्रसंग होता, जेव्हा भारताने आशिया कपमध्ये भाग घेतला नाही. पण पाकिस्तान देखील आशिया कपमधून बाहेर होता. भारतात 1990-91 मध्ये झालेला चौथा आशिया कप हे उदाहरण आहे. तेव्हा पाकिस्तानने भारतासोबत तणावपूर्ण राजकीय नात्यांमुळे स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे आशियाई क्रिकेटला मोठा धक्का बसला, कारण स्पर्धेने एक मोठा स्पर्धात्मक सामना गमावला. भारताने त्या वर्षी श्रीलंकाला हरवून स्पर्धा जिंकली, पण पाकिस्तानच्या अनुपस्थितीमुळे एक मोठे शून्य निर्माण झाले.

दोन्ही देशांमधील खराब संबंधांमुळे 1993 वर्षातील आशिया कपही रद्द झाला. त्यानंतर आशिया कप 1995 मध्ये सुरु झाला, जो शारजाहमध्ये पार पडला.

1986 मध्ये श्रीलंका येथे झालेल्या दुसऱ्या आशिया कपमधून भारताने सुरक्षा कारणास्तव नाव मागे घेतले होते. तेव्हा श्रीलंकेत सरकार आणि लिट्टे यांच्यात गृहयुद्ध सुरु होते. अशा परिस्थितीत भारत सरकारने बीसीसीआयला स्पर्धेपासून दूर राहण्याचा आदेश दिला. त्या वेळी स्पर्धा फक्त श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सहभागाने पार पाडली.

Comments are closed.