100 धावांही होणार नाहीत अशी अवस्था, पण घसरलेल्या पाकिस्तानची लाज आफ्रिदीने राखली, शेवटच्या दोन

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे जबरदस्त कामगिरी करत आशिया कपच्या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात पाकिस्तानला केवळ 127 धावांवर रोखले. भारताकडून कुलदीप यादवने अवघ्या 18 धावा देत 3 बळी घेतले, तर अक्षर पटेलनेही 18 धावा देत 2 विकेट्स घेतले. जसप्रीत बुमराहच्या खात्यातही 2 विकेट्स जमा झाल्या. कुलदीप यादव हॅटट्रिकच्या जवळ पोहोचले होता, पण थोडक्यात हुकला.

सुरुवात खराब असूनही, पाकिस्तानी संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी झाला. पाकिस्तानी संघाकडून साहिबजादा फरहान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, ज्याने 40 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने वादळी खेळ खेळत 33 धावा केल्या. त्या दोघांव्यतिरिक्त, कोणताही पाकिस्तानी फलंदाज 20 धावांचा आकडाही गाठू शकला नाही.

सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट

भारत-पाकिस्तान सामना एका विकेटने सुरू झाला. हार्दिक पंड्याने सामन्याच्या पहिल्या अधिकृत चेंडूवर ‘0’ च्या स्कोअरवर सॅम अय्युबला आऊट केले. आशिया कप 2025 मध्ये सलग दुसऱ्यांदा अय्युब गोल्डन डकचा बळी ठरला. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने मोहम्मद हरिसला 3 धावांवर बाद केले. ओमानविरुद्ध 63 धावा करणारा मोहम्मद हरिस आणि कर्णधार सलमान आगा देखील अपयशी ठरले.

65 धावांत 6 विकेट पडल्या, मग…

एकेकाळी पाकिस्तान संघाने 13 षटकांत 65 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या, पण टेल-एंड फलंदाजांनी कसा तरी संघाचा स्कोअर 120 च्या पुढे नेला. एकेकाळी 100 धावा करणेही त्यांना कठीण वाटत होते. फहीम अश्रफने 11 धावा आणि सुफियान मुकीमने 10 धावा केल्या. या छोट्या खेळींमुळे पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.

शाहीन आफ्रिदीने राखली पाकिस्तानची लाज

शाहीन आफ्रिदी 17 व्या षटकात फलंदाजीला आला, त्यावेळी पाकिस्तान संघाने 83 धावांवर सातवा विकेट पडला होता. धावगती सुमारे 5 धावांवर होती, त्यामुळे पाकिस्तानसाठी 120 धावांची धावसंख्या जवळजवळ अशक्य वाटत होती. येथून शाहीन आफ्रिदीने 16 चेंडूत 33 धावांची तुफानी खेळी खेळून पाकिस्तान संघाची लाज राखली. आफ्रिदीने त्याच्या डावात 4 गगनचुंबी षटकार मारले.

हे ही वाचा –

Hardik Pandya : पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर रडवणाऱ्या हार्दिक पांड्याने रचला इतिहास! IND vs PAK सामन्यात केला हा मोठा पराक्रम

आणखी वाचा

Comments are closed.