सूर्या अँड कंपनीचा पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राइक’, एकतर्फे सामन्यात पाकड्यांना धूळ चारली, टीम इ
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला धुळ चारली. रविवारी झालेल्या या रोमांचक लढतीत भारताच्या खेळाडूंनी सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानवर एकतर्फी मात केली. आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी अचूक आणि जबरदस्त माऱ्याने पाकिस्तानला केवळ 127 धावांवर रोखले. यानंतर भारताच्या फलंदाजांनी सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत विजय सोपा केला. त्यांच्या दमदार खेळीमुळे भारताने सहज विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडिया आता ग्रुप ‘ए’च्या पॉइंट्स टेबलवर टॉपर आहे.
कर्णधार सलमान आगा निर्णय ठरला चुकीचा
टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. पाकिस्तानची टीम ऑलआउट होण्यापासून जरी वाचली, तरी 9 गडी गमावून फक्त 127 धावांचाच आकडा गाठू शकली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा पहिला विकेट पडला आणि तिथून सुरू झालेली विकेट्सची पडझड थांबायलाच तयार नव्हती.
पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा सलामीवीर साहिबजादा फरहानने केल्या. त्याने 44 चेंडूत 40 धावा करताना काही वेळ पाकिस्तानला सावरायचा प्रयत्न केला, पण अखेर तो कुलदीप यादवच्या फिरकीत फसला. याशिवाय पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना शून्यावर माघारी परतावे लागले. एक वेळ अशी आली होती की 100 धावांचा टप्पा पार करणेही कठीण वाटत होते. मात्र अखेरच्या टप्प्यात शाहीन शाह आफ्रिदीने फटकेबाजी करत 16 चेंडूत 33 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला कसाबसा बचाव करता येईल असा टप्पा गाठून दिला.
भारतीय गोलंदाजांची धडाकेबाज कामगिरी
भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करून पाकिस्तानची कोंडी केली. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीच्या दोन षटकांतच दोन बळी घेत पाकिस्तानला दबावाखाली ढकलले. त्यानंतर कुलदीप यादवने आपल्या स्पेलमध्ये फक्त 18 धावा देत 3 गडी टिपले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खात्यात 1-1 विकेट जमा झाली.
धावांचा पाठलाग अभिषेक शर्माचा आक्रमक अंदाज
भारताने विजयासाठी दिलेल्या 128 धावांचा पाठलाग आक्रमक अंदाजात केला आहे. अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूपासून पाकिस्तानी गोलंदाजांना आसमान दाखवले. शाहीन आफ्रिदीच्या ओव्हरमध्ये अभिषेकने एक चौकार आणि एक षटकार लगावला. एका षटकानंतर भारताचा स्कोर कोणत्याही विकेटशिवाय 12 धावा इतका झाला. पण, यानंतर सॅम अयुबवर सलग दोन चौकार ठोकल्यानंतर शुभमन गिल मात्र जास्त वेळ टिकू शकला नाही. सॅम अयुबनेच गिलला स्टंपिंग करून माघारी धाडले. गिलने सात चेंडूत 10 धावा केल्या.
भारताने 41 धावांत 2 विकेट्स गमावल्या होत्या. येथून तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी जबाबदारी स्वीकारली आणि 56 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. तिलक वर्मा यांनी 31 धावा केल्या, पण तोही सॅम अयुबच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. 47 धावा काढून कर्णधार सूर्यकुमार नाबाद राहिला.
सूर्यकुमारने षटकार मारला
भारत-पाकिस्तान सामना ज्या पद्धतीने संपला, त्यावरून भारतीय क्रिकेट चाहत्यांना एमएस धोनीची आठवण झाली असेल. कर्णधार सूर्यकुमार यादवने सुफियान मुकीमच्या चेंडूवर षटकार मारून भारताचा 7 विकेट्सने विजय निश्चित केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.