हानेक हात नाही! भारतीय नियोजकांना त्यांना खाली आणण्यासाठी टाळा, पाकिस्तानी क्रीडा आणि पाकिस्तानी क्रीडा खाली आणि मैदानात गायले

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया कपमधील भारत–पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताने सहज विजय मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केले. मात्र, सामन्यानंतर जे घडले ते क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे खेळाडू हात मिळवतात, पण यावेळी भारतीय खेळाडूंनी ते टाळले.

सूर्या थेट ड्रेसिंग रूमकडे परतला

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयी षटकार ठोकत सामना संपवला. त्यानंतर तो नॉन-स्ट्रायकर एंडवरील शिवम दुबे सोबत थेट ड्रेसिंग रूमकडे परतला. पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूसोबत हात न मिळवता ते थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले. भारतीय संघातील इतर खेळाडू बाहेरच सूर्या आणि दुबेला भेटले, त्यांच्याशी हस्तांदोलन करून लगेच आत परतले.

पाकिस्तानचे खेळाडू प्रतीक्षेत

सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानात रांगेत उभे राहून भारताच्या खेळाडूंची वाट पाहत राहिले. पण भारतीय संघातील एकाही खेळाडूने त्यांच्याकडे जाण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू मान खाली करून मैदान सोडल. पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना 127 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग भारताने केवळ 16 व्या षटकात 3 विकेट्स गमावून पूर्ण केला.

टॉसवेळीही केले नाही हस्तांदोलन

विशेष म्हणजे, टॉसवेळीही पारंपरिक हस्तांदोलन झाले नव्हते. सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हात न मिळवता निघून गेला. आशिया कप सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला सात विकेट्सने पराभूत केले आणि सलग दुसरा विजय नोंदवला. भारताने 25 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला हरवले आणि चालू स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून संघाला विजयाकडे नेले. त्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. इतर खेळाडूंनीही तसेच केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने 20 षटकांत नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 15.5 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 131 धावा केल्या आणि सामना जिंकला.

हे ही वाचा –

India vs Pakistan Asia Cup 2025 : सूर्या अँड कंपनीचा पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राइक’, एकतर्फी सामन्यात पाकड्यांना धूळ चारली, टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये टॉपर

आणखी वाचा

Comments are closed.