यूक्रेनचा मोठा निर्णय, भारताकडून डिझेल खरेदी बंद, 1 ऑक्टोबरपासून निर्णय लागू
नवी दिल्ली : अमेरिकेनं नाटोच्या देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असा सल्ला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन नाटोमधील सदस्य देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यूक्रेननं यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. भारतातून आयात केल्या जाणाऱ्या डिझेलची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यूक्रेनची एक एनर्जी कन्सलटन्सी एनकोरनं सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरपासून भारताकडून खरेदी केल्या जाणाऱ्या डिझेलवर बंदी घालण्याचा निर्णय यूक्रेननं घेतला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार एनकॉरनं म्हटलं की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो यामुळं यूक्रेनला हे पाऊल उचलावं लागलं आहे. एनकोरनं म्हटलं की रशियाकडून ड्रोन आणि मिसाईल द्वारे यूक्रेनच्या तेल रिफायनऱ्यांवर हल्ले करत आहे. कंपनीच्या मते यूक्रेनच्या सूरक्षा एजन्सीजनं त्यांना आदेश दिला की भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या डिझेलची चौकशी करावी. ज्याद्वारे रशियन कंपोनंटबाबत माहिती घेता येईल.
दुसरी कन्सलटन्सी A-95 नं पहिल्यांदा सांगितलं की या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात यूक्रेनची एक मोठी तेल रिफायनरी खराब झाली होती. ज्यामुळं व्यापाऱ्यांना भारताकडून डिझेल खरेदी करावी लागली होती. यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं भारताकडून डिझेल खरेदी केली होती. जे सोव्हिएतच्या जुन्या मानकांची पूर्तता करत होते.
भारताकडून यूक्रेन किती डिझेल खरेदी केलं जायचं?
एनकोरनं म्हटलं की यूक्रेननं ऑगस्ट 2025 मध्ये भारताकडून 119000 टन डिझेल खरेदी केलं होतं. जे त्यांच्या एकूण डिझेल आयातीच्या 18 टक्के अधिक होतं. 2022 मध्ये रशिया यूक्रेन युद्ध सुरु झालं होतं. त्यापूर्वी यूक्रेन बेलारुस आणि रशियाकडून डिझेल खरेदी करत होता. A-95 कन्सलटन्सीनं म्हटलं की या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत डिझेलची आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घटून 2.74 मिलियन मेट्रिक टन आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो कारण आखाती देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. रशियाकडून मिळणाऱ्या आणि आखाती देशांच्या कच्चा तेलाच्या दरात फरक आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.