रशिया-युक्रेन युद्ध थांबवणं सोप्पं नाही!

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध एका दिवसात थांबवेन, अशी वल्गना निवडणूक प्रचाराच्या काळात करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर वास्तव उमगले आहे. हे युद्ध थांबवणे वाटते तितके सोपे नाही, अशी कबुली त्यांनी आज दिली.

मीडियाशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. ‘‘मी जगातली सात युद्धे थांबवली. मला वाटले होते आपण हेही युद्ध थांबवू. पण ते इतक्या लवकर थांबेल असे वाटत नाही,’’ असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत येऊन 9 महिने उलटले तरी रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. टॅरिफचा आधार घेऊन आणि रशियाची आर्थिक नाकेबंदी करून त्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. पुतीन आणि झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्र चर्चाही केली. मात्र त्यातूनही काही साध्य झाले नाही. त्यामुळे ट्रम्प निराश झाले आहेत.

Comments are closed.