ज्वेलर्सकडून पैसे उकळले, जीआरपीच्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन

राजस्थानमधील एका ज्वेलर्सला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात धमकी, मारहाण आणि पैसे उकळल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जीआरपीच्या तीन पोलिसांचा मुंबई उच्च न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मुंबईहून राजस्थानला जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या बॅगांची एका पोलीस अधिकाऱ्याने तपासणसी केली. त्यावेळी बॅगेत 31 हजार 900 रुपये रोख आणि 14 ग्रॅम सोन्याचा तुकडा आढळले. रोख रकमेची चौकशी करण्यासाठी एका खोलीत नेण्यात आले आणि त्यांना तुरुंगवासाची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर कागदावर सही करण्यास भाग पाडण्यात आले, याप्रकरणी जीआरपीच्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ऍड. अनिकेत निकम यांच्यामार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केला, त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
Comments are closed.