माजी खासदार मिमी चक्रवर्ती प्रश्न विचारण्यासाठी एडच्या आधी दिसतात

सट्टेबाजी अॅपप्रकरणी झाली चौकशी

वृत्तसंस्था/ कोलकाता

तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती या सोमवारी ईडीसमोर उपस्थित राहिल्या. अवैध सट्टेबाजी अॅपशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मिमी यांची चौकशी करण्यात आली. 36 वर्षीय मिमी यांचा जबाव एका अवैध सट्टेबाजी अॅपशी निगडित प्रकरणी पीएमएलए अंतर्गत नोंदवून घेण्यात आला. माजी खासदार आणि अभिनेत्रीचा काही जाहिराती आणि आर्थिक देवाणघेवाणीद्वारे या अॅपशी संबंध आल्याचे मानले जात आहे.

याप्रकरणी ईडे यापूर्वीच माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची चौकशी केली आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला मंगळवारी याप्रकरणी ईडीसमोर उपस्थित राहणार आहे. आगामी काळात ईडीकडुन आणखी क्रीडापटू आणि कलाकारांची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. केंद्र सरकारने अलिकडेच एक कायदा आणत अशाप्रकारच्या अॅप्सवर बंदी घातली आहे.

Comments are closed.