सिराज ठरला ऑगस्ट महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑगस्ट महिन्याचा आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार पटकावला आहे. आयर्लंडची महिला क्रिकेटपटू ऑर्ला प्रेंडरगेस्ट हिलाही महिला गटात हा मान मिळाला. ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हिंदुस्थानने सहा धावांनी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविली. या कामगिरीबद्दल बोलताना सिराज म्हणाला, ‘‘आयसीसीकडून महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड होणे हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे. अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी ही एक अविस्मरणीय मालिका होती आणि या मालिकेतला हा सामना सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक होता.’’ सिराज पुढे म्हणाला, ‘‘महत्त्वाच्या क्षणांत संघाला योगदान देता आले याचा मला अभिमान आहे.

Comments are closed.