Health Tips: रात्री ब्रा घालून झोपता? मग होतील गंभीर समस्या; एकदा तज्ञांचे मत वाचाच !
रात्री झोपताना ब्रा घालून झोपावे का? असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण रात्री ब्रा घालून झोपल्याने अस्वस्थ वाटते. याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्यायचे झाल्यास रात्री ब्रा घालून झोपल्याने अनेक समस्या होऊ शकतात. तज्ञांच्या मते, रक्ताभिसरण, त्वचा आणि अगदी झोपेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेमके काय करावे हे समजत नाही. चला तर मग याबाबत जाणून घेऊया…
रात्री ब्रा घालून झोपल्याने तुम्हाला अनेक प्रकारचा त्रास होऊ शकतो. जसे की,
बुरशीजन्य संसर्ग आणि खाज सुटण्याचा धोका
रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनाभोवती जास्त घाम येतो. त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते. यामुळे नंतर खाज सुटू शकते.
रॅशेस आणि काळे डाग
दिवसभर ब्रा घातल्यानंतर रात्री झोपताना ते काढून झोपणे चांगले असते. म्हणजे जर तुम्ही ब्रा घालून झोपलात तर स्तनाभोवतीच्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते. पुरळांमुळे त्वचेवर काळे डाग पडतात.
रक्ताभिसरणात अडथळा
रात्रभर ब्रा घालून झोपल्याने स्तनाभोवती रक्ताभिसरण योग्यरित्या होऊ शकत नाही.
झोप
चांगल्या झोपेसाठी आरामदायी कपडे घालणे महत्त्वाचे आहे. ब्रा घालून झोपल्याने उष्णता आणि घाम येण्याची समस्या उद्भवते. यामुळे तुम्हाला आराम मिळत नाही आणि झोप येत नाही.
स्तनाच्या कर्करोगाचा धोका
झोपताना रात्री ब्रा काढून टाकल्याने स्तनाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण योग्यरित्या सुरू होते. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, रात्री ब्रा घालून झोपणे हे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा काढून रात्री झोपणे चांगले. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टळतात.
Comments are closed.