आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 119 अंकांनी घसरून 81,785 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी घसरून 25,069 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी 1.5 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटन, सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरण झाली, तर बजाज फायनान्स, इटरनल, रिलायन्स, अदानी पोर्ट, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ट्रेंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
Comments are closed.