Twins Town : भारतात आहे जुळ्यांचं गाव, जन्माला येतात केवळ जुळी मुले

भारतात विविध तऱ्हेच्या रहस्यमय गोष्टी पाहायला मिळतात. यातील काही गोष्टींचे रहस्य मानवाने उलगडले आहे तर काही अद्यापही शोधू शकला नाही. याच गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे जुळ्यांचे गाव. ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या भारतात असे एक गाव आहे, जेथे केवळ जुळी मुलेच जन्माला येतात. त्यामुळे या गावाला ‘जुळ्यांचे गाव’ असे म्हटले जाते. जुळी भावंडे दिसली की, आपल पहिले त्यांच्यामध्ये काय साम्य आहे, हे शोधतो. पण, तुम्हाला येथे संपूर्ण गावात जुळी भावंडेच दिसतील. नक्की हे गाव कुठे आहे? काय आहे येथील वैशिष्ट्य जाणून घेऊयात,

प्रत्येक घरात केवळ जुळी मुले –

देशातील केरळामध्ये हा चमत्कार घडत आहे. केरळातील मल्लपुरम जिल्ह्यात हे गाव आहे. गावाचे नाव ‘कोडिन्ही’ असे आहे. येथे प्रत्येक घरात केवळ जुळी मुलेच जन्माला येतात. केवळ जुळी मुले जन्माला येणारे हे देशातील एकमेव गाव आहे.

हेही वाचा – 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये फरक काय? 99% लोकांना माहित नाही कारण

1000 मुलांमागे 45 जुळी मुले –

संपूर्ण देशात 1000 मुलांच्या जन्मामध्ये 9 मुले जुळी असतात. पण, कोडिन्ही गावात 1000 मुलांमागे 45 जुळी मुले जन्म घेतात. हा आकडा दोन ते तीन वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगात दुसरा आणि आशियामध्ये पहिल्या स्थानावर हे गाव आहे.

स्थानिकांची धारणा –

कोडिन्ही गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, या गावावर देवाची कृपा आहे, त्यामुळे येथे जुळी मुले जन्म घेत आहेत.

संशोधक हैराण –

कोडिन्ही या गावात प्रत्येक कुटूंबात कशी जुळी मुले जन्माला येतात, याचा उलगडा करण्यासाठी भारत, लंडन आणि जर्मनीतील संशोधकांच्या गटाने 2016 मध्ये यावर संशोधन केले होते. यासाठी शास्त्रज्ञांनी गावकऱ्यांचे डीएनए घेतले. तसेच गावकऱ्यांच्या केसाचे आणि लाळेचे नमुने गोळा केले आणि संशोधन केले. पण, शास्त्रज्ञांना कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे गावात जुळी मुलेच जन्माला का येतात, हे कोडे अजून उलगडलेले नाही.

हेही वाचा  – या ठिकाणी व्हॅकेशनला जातात जगातील सर्वात श्रीमंत लोक

Comments are closed.