तुला कोणती पोस्टिंग हवी? नामांकित मॉलमध्ये सुरक्षारक्षक महिलेवर सहकाऱ्याकडून अत्याचार; पुण्याती

गुन्हे ठेवा: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) वाकड (wakad) परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर (Female Security Guard) तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पतीसह खाजगी सुरक्षा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होती. हे दोघेही वाकड येथील मिलेनियम मॉलमध्ये सुरक्षा कर्तव्य बजावत होते. याच कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या मनोज धोंडीराम कदम (वय 45) याने ड्युटीदरम्यान पीडित महिलेला तिसऱ्या मजल्यावरील एका बंद खोलीत नेले.

तुला कोणती पोस्टिंग हवी?

तेथे आरोपीने महिलेला “तुला कोणती पोस्टिंग हवी?” असा विचारणा केली. यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील वर्तन करत शारीरिक जबरदस्ती केली. महिलेने तात्काळ त्याला विरोध केला आणि प्रतिकार करत त्याला मारहाण केली. मात्र, आरोपीने तिचा प्रतिकार झुगारून देत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.

वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी मनोज कदम याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 351(2) आणि 351(3) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या घटनेमुळे मॉलमधील सुरक्षा यंत्रणा, महिला सुरक्षेचा प्रश्न, तसेच खाजगी सुरक्षा कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Krishna Andekar: काल बापाने कोर्टात एन्काऊंटरची भीती बोलून दाखवली अन् आज कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला

Pune Crime News: नुकतंच मिसरुड फुटलेल्या पोरांना गँगमध्ये घ्यायचा, त्यांच्याकडून सुपारी वाजवायचा, बंडू आंदेकरच्या पॅटर्नबाबत पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती

आणखी वाचा

Comments are closed.