Best Fruits For Skin: त्वचेसाठी सर्वोत्तम ठरतात ‘ही’ फळे, जाणून घ्या पोषणतज्ञांचे मत

प्रत्येकजण निरोगी त्वचेसाठी उपाय करत असतो. त्यासाठी अनेक बाजारातील प्रोडक्ट्स वापरले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? आपला आहार हाच निरोगी त्वचेसाठी सर्वात बेस्ट उपाय आहे. म्हणजेच तुम्ही जो आहार घेता त्याचा तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे तुमच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. काही फळे ही त्वचेसाठी सर्वोत्तम मानली जातात. फळे खाल्ल्याने त्वचेला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे त्वचा आतून निरोगी होते. त्यामुळे त्वचेसाठी कोणती फळे सर्वोत्तम आहेत हे तज्ञांकडून जाणून घेऊया…

अलीकडेच, आहारतज्ज्ञ दीपशिखा शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्वचेसाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या ३ फळांचा उल्लेख केला आहे.

संत्रा
संत्रे हे त्वचेसाठी चांगले असते. हे फळ व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. याशिवाय, संत्र्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे त्वचा निस्तेज दिसत नाही आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

पपई
पपई त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले पपेन हे एन्झाइम त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि मुलायम हवी असेल तर तुमच्या रोजच्या आहारात पपईचा समावेश नक्की करा.

द्राक्षे
त्वचेसाठी द्राक्षे खाण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्षे त्वचेसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. त्यात पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात. द्राक्षांचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. ते त्वचेला हायड्रेट देखील ठेवते.

Comments are closed.