टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार या कंपनीचं नाव! मिळाला नवा टायटल स्पॉन्सर

बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर शोध संपला आहे. रिपोर्ट्सनुसार टीम इंडिया आता आपल्या जर्सीवर अपोलो टायर्सचे नाव घेऊन मैदानात उतरणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि या कंपनीमध्ये करार निश्चित झाला आहे. समजते की प्रत्येक सामन्यासाठी अपोलो टायर्स बीसीसीआयला तब्बल 4.5 कोटी रुपये देणार आहे. ऑनलाईन गेमिंग बिल 2025 आल्यानंतर ड्रीम 11 आणि बीसीसीआय यांचा करार संपुष्टात आला होता. या बिलपूर्वी ड्रीम 11 टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर होता.

टीम इंडियाला नवा टायटल स्पॉन्सर मिळालेला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाच्या जर्सीवर आता अपोलो टायर्सचं नाव दिसणार आहे. बीसीसीआय आणि या कंपनीमधील करार जवळपास निश्चित झाला आहे. प्रत्येक सामन्यासाठी अपोलो टायर्स बीसीसीआयला तब्बल 4.5 कोटी रुपये देणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया टायटल स्पॉन्सरशिवायच स्पर्धेत उतरली होती.

ऑनलाईन गेमिंग बिल 2025 आल्यानंतर बीसीसीआयला ड्रीम 11 सोबतचा करार तात्काळ संपवावा लागला होता. ड्रीम 11 आणि बीसीसीआय यांच्यात तब्बल 358 कोटी रुपयांचा करार झाला होता आणि हा करार 2023 ते 2026 पर्यंत चालणार होता. या नव्या गेमिंग बिलमध्ये फँटसी गेम्सला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तरतूद होती, ज्यामध्ये ड्रीम 11चाही समावेश होता. या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी ड्रीम 11 हा टीम इंडियाचा मुख्य टायटल स्पॉन्सर होता.

Comments are closed.