मोठी बातमी : सूर्यकुमार नव्हे डुXXX कुमार, पाकच्या मोहम्मद युसूफने गरळ ओकली, भारताच्या विजयाने

माजी पाकिस्तानचा कर्णधार यूसुफ मोहम्मदचा गैरवापर सूर्यकुमार यादव त्याला डुक्कर म्हणतो: आशिया कपमध्ये दोन दिवसांपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायहोल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. मात्र, देशवासियांच्या पहलगाम हल्ल्यानंतरच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे हा सामना झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंना पाकच्या क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणे टाळल्याचे पाहायला मिळाले. आता हस्तांदोलन न केल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेटपटूंची ही कृती पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूंच्या जिव्हारी लागली आहे.  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने (यूसुफ मोहम्मद) भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी (सूर्यकुमार यादव) ‘डुक्कर’ हा शब्द वापरलाय. सूर्यकुमार यादववर (सूर्यकुमार यादव) अश्लाघ्य टिप्पणी करण्याव्यतिरिक्त युसूफने भारतावर सनसनाटी आरोप देखील केले. त्याने म्हटले की भारत अंपायर आणि मॅच रेफरीचा वापर करून पाकिस्तानला त्रास देत आहे. मोहम्मद युसूफने (यूसुफ मोहम्मद) नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊयात..

मोहम्मद युसूफची सूर्यकुमार यादवला शिवीगाळ

एका टीव्ही शोमध्ये क्रिकेट तज्ज्ञ म्हणून बसलेल्या युसूफने जाणूनबुजून सूर्यकुमार यादवचं नाव चुकीचं घेतलं आणि त्यांना डुक्कर म्हटलं. युसूफ म्हणाला –“भारत आपल्या फिल्मी दुनियेतून बाहेरच पडू शकत नाही. ज्या पद्धतीने ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत – पंचांचा वापर करत आहेत, मॅच रेफरीमार्फत पाकिस्तानला त्रास देत आहेत – ही खूप मोठी आणि लाजिरवाणी बाब आहे. भारताने याबाबत लाज बाळगली पाहिजे.”

आशिया कपमध्ये नुकत्याच खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानला भारताकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, आता पाकिस्तानच्या टीमने आरोप केला होता की मॅच रेफरी अँडी पायकॉफ्ट यांनी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना हस्तांदोलन करू नका असे सांगितले होते. त्यानंतर पीसीबीने आयसीसीकडे लेखी तक्रार करून पायकॉफ्ट यांना पाकिस्तानच्या पुढील सामन्यातून हटवावे, अशी मागणी केली. मात्र आयसीसीने हे स्पष्टपणे नाकारले. आयसीसीनुसार पायकॉफ्ट यांनी असं काहीही सांगितलेलं नव्हतं. अगदी भारतीय संघानेसुद्धा हे नाकारले की मॅच रेफरीने त्यांना अशा सूचना केल्या होत्या.

पाकिस्तानने आशिया कप बहिष्कार करण्याची धमकीही दिली आहे. पण त्यांच्यासाठी असं करणं अवघड आहे, कारण या पाऊलामुळे त्यांना भयानक आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. पीसीबीमधील सूत्रांनुसार, आयसीसी प्रमुख जय शाह पाकिस्तानवर या कृतीसाठी मोठा दंड ठोठावू शकतात, जो पीसीबीला सहन करणं शक्य होणार नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.