Asia Cup: यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिल्यास पाकिस्तानला बसणार मोठा फटका! कोटींचं नुकसान निश्चित
भारतीय संघाने 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर सर्व भारतीय खेळाडू हात न मिळवता थेट ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले. पाकिस्तानी खेळाडू मैदानावरच त्यांची वाट पाहत राहिले. टीम इंडियाच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) संतापला. बोर्डाने सामना रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांच्यावर आयसीसीकडून कारवाईची मागणी केली होती. बोर्डाने इशारा दिला की, जर अँडीवर कारवाई झाली नाही, तर ते स्पर्धेचा बहिष्कार करतील. मात्र आयसीसीने पाइक्रॉफ्टवर कारवाई करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत जर पीसीबीने आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) बहिष्कार केला, तर त्यांच्या अडचणींमध्ये भर पडेल.
जर पाकिस्तानने यूएईविरुद्धचा सामना बहिष्कृत केला, तर ते थेट स्पर्धेबाहेर होतील. त्यामुळे ग्रुप ए मधून भारत आणि यूएई या दोन संघांना सुपर 4 मध्ये प्रवेश मिळेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आशियाई विजेतेपदाचे स्वप्नही इथेच संपेल.पीसीबीने जर बहिष्काराचा निर्णय घेतला, तर त्यांना एसीसीकडून फारच कमी उत्पन्न मिळेल. आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे एसीसीकडून कमी रेव्हेन्यू मिळाल्यास त्यांची आर्थिक स्थिती आणखी खालावेल, जी पीसीबीसाठी सध्या सहन करणे कठीण ठरेल.
पाकिस्तान क्रिकेट संघाने जर आशिया कप 2025 सारख्या मोठ्या स्पर्धेचा बहिष्कार केला, तर त्यांच्या स्पॉन्सरकडूनही नाराजी व्यक्त होईल. भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या संघांविरुद्ध सामने न खेळल्यास, स्पॉन्सरकडून दिल्या जाणाऱ्या रकमेतही कपात होऊ शकते.
एसीसीने आशिया कप 2029 ची यजमानी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिली आहे. परंतु जर पीसीबीने हा इव्हेंट मध्येच सोडला, तर त्यांच्याकडून 2029 ची यजमानी काढून घेण्यात येऊ शकते. मग एसीसी हा इव्हेंट अफगाणिस्तान किंवा बांगलादेश यांच्यापैकी कुणाला तरी देऊ शकतो.
सध्या एसीसीचे अध्यक्षपद पीसीबीचे चेअरमन मोहसिन नक़वी (Mohsin Nakvi) यांच्याकडे आहे. मात्र जर पाकिस्तानने या स्पर्धेचा बहिष्कार केला, तर नक़वींचेही पद धोक्यात येईल. इतर क्रिकेट बोर्ड एकत्र येऊन मोहसिन यांना या पदावरून हटवू शकतात.
Comments are closed.