Asia Cup: पाकिस्तानशी हात न मिळवल्यामुळे रिकी पाँटिंगने भारताला 'लूजर' म्हटलं का? ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सांगितली खरी गोष्ट!

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग (Riki ponting) यांनी पाकिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंनी हात न मिळवल्याबाबत केलेल्या कथित टीकेचे खंडन केले आहे. रविवारच्या भारत–पाकिस्तान (IND vs PAK) आशिया कप 2025 च्या सामन्यानंतर भारतीय खेळाडू हात न मिळवता थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले होते.

यानंतर सोशल मीडियावर एक वक्तव्य व्हायरल झाले. त्यात असा दावा करण्यात आला की, पाँटिं स्काय स्पोर्ट्सवर म्हणाले होते, हा सामना कायम लक्षात राहील, ज्यात भारत मोठा लूजर ठरला. पाकिस्तानी खेळाडूंनी हात मिळवून खऱ्या अर्थाने जेंटलमन्स गेमची प्रतिष्ठा राखली, तर भारत लूजर दिसला.

या कथित विधानानंतर भारतीय चाहत्यांमध्ये संताप उसळला आणि पाँटिंगवर टीका झाली. यावर स्वतः पाँटिंगने एक्स (Twitter) वर पोस्ट करून स्पष्टीकरण दिले की, माझ्या नावाने सोशल मीडियावर काही खोट्या कमेंट्स फिरत आहेत. मी असे कोणतेही विधान केलेले नाही. खरं तर मी आशिया कपबद्दल एकही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारतीय खेळाडूंनी हात न मिळवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) देखील संतापला आहे. पीसीबीने आयसीसीला पत्र लिहून या प्रकरणाची तक्रार केली आहे आणि सामना रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आशिया कप 2025 मधील पुढील सामना बहिष्कृत करू, अशी धमकी पीसीबीने दिली होती. मात्र रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने पीसीबीची मागणी अधिकृतपणे फेटाळून लावली आहे.

Comments are closed.