शिवसेनेचे मनपासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन; भ्रष्ट कारभार, दिशाहीन नियोजनाबद्दल संताप

नांदेड महापालिकेचा भ्रष्ट कारभार, दिशाहीन नियोजन, मास्टर प्लॅनचा उडालेला बोजवारा, याविरुध्द आज शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या समोर ‘बॉब मारो’ आंदोलन करून सबंध नांदेडकरांचे लक्ष वेधले. महानगराध्यक्ष प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी मनपाचा परिसर दणाणून सोडला. भ्रष्ट महापालिकेचा निषेध असो, दीडशे खोके एकदम ओके, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, जवाब दो जवाब दो, भ्रष्टाचार का जवाब दो… या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. महापालिकेची प्रतिकृती करुन त्याठिकाणी रिंगण घालून शिवसैनिकांनी बोंबा मारल्या.

नांदेड महापालिकेच्या गलथान कारभारामुळे व शून्य नियोजनामुळे नांदेडचे नागरिक त्रस्त असून, चुकीच्या नियोजनामुळे परवाच्या अतिवृष्टीत दहा हजार लोकांच्या घरात पाणी घुसले. मात्र त्यांचे पंचनामे किंवा त्यांना आर्थिक मदत अद्यापपर्यंत देण्यात आली नाही. शहरातील कचरा उचलण्यासाठी यापूर्वी शंभर कोटीचे टेंडर होते ते दोन महिन्यापूर्वी अडीचशे कोटी करुन कंत्राटदारास टेंडर देण्यात आले. रक्कम वाढविल्यानंतर देखील शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णता चुकले असून, विष्णुपुरी प्रकल्प काठोकाठ भरला असताना आजही शहरात तीन दिवसाआड पाणी येत आहे. शहराचे दिशाहीन नियोजन, मास्टर प्लॅ नचे उडालेले धिंडवडे यामुळे जनता त्रस्त आहे. यासंदर्भात आवाज उठविण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने नांदेड महापालिकेसमोर बोंबाबोंच आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महापालिकेच्या दिशाहीन नियोजनामुळे नांदेड शहराची वाट लागली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली असून, मोठ्या प्रमाणात प्रचंड खर्च होऊनही पुन्हा पुन्हा रस्ते खोदले जात आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. कचऱ्याचे टेंडर शंभर कोटीवरुन अडीचशे कोटीवर गेले. त्यात दीडशे कोटीचा पोटाळा झाला त्याचे वाटेकरी कोण, असा सवाल त्यांनी केला. टेडरची रक्कम वाढल्यानंतर सुध्दा शहरातील कचरा आहे त्याच ठिकाणी राहिल्याने, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याचे उत्तर मनपाने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. आंदोलनाच्या संदर्भात लावण्यात आलेले होर्डिग मनपाने काढून घेतले, मात्र अन्य – सत्ताधाऱ्यांच्या डोडिंगला हातही लावला नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी शहरातील कचऱ्याची होळी करण्यात आली.

यावेळी निकिता चव्हाण, ब्रिजलाल उगवे, भाया शर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांच्यासह उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, विजय बगाटे, महानगरप्रमुख (दक्षिण) मनोज यादव, शहरप्रमुख जितूसिंग टाक, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, आनंद जाधव, नवज्योतसिंग गाडीवाले, साहेबराव मामीलवाड, गजानन हरकरे, भाया शर्मा, सचिन पाटील, ब्रिजलाल उगवे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक निकिता चव्हाण, तालुकाप्रमुख नंदू वैद्य, निकिता शहापूरवाड, अॅड. जयश्री खंदारे, वंदना जाधव, मंगलाताई वानखेडे, लक्ष्मी चव्हाण, माधवराव कल्याणकर, गणेश पेन्सलवार, मनोज काकडे, शिरीष महाबळे, किरण देशमुख, सतीश कोकाटे, राहुल मानेवर, सतीश झगडे, तुलसीदास नंदाने, शेख फैयाज, शब्बीर भाई, सूरज फटाले, ज्योती लिंबापुरे, बालाजी सूर्यवंशी, मुत्रा पिटलोड, दैवशाला जाधव, सुनीता जाधव, अस्लम खान, दयासागर शिवरात्री, शशिकांत तादलापूरकर, लक्ष्मीकांत आदलापूरकर, आनंद वाघमारे, राहुल गंगवणे, संदीप जिल्हेवाड आदी उपस्थित होते.

Comments are closed.