आयसीसी रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचा धमाका! 'या' खेळाडूला मागे टाकत बनली नंबर 1
भारतीय स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत अफलातून खेळ करून दाखवला आहे. पहिल्या सामन्यात तिने अर्धशतक ठोकले होते. ती सतत भारतासाठी जबरदस्त कामगिरी करत आहे. टी-20 असो, वनडे असो किंवा कसोटी, प्रत्येक फॉरमॅटमध्ये ती चमकत आहे. आयसीसी महिला क्रमवारीतही स्मृतीने कमाल केली असून इंग्लंडच्या खेळाडूला मागे टाकत तिने नंबर 1 चा मान पटकावला आहे.
आयसीसी महिला वनडे क्रमवारीत याआधी नॅट सायव्हर-ब्रंट पहिल्या स्थानी होती. पण आता मानधनाने तिला मागे टाकले आहे. मंधाना 735 गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचली आहे, तर नॅट सायव्हर-ब्रंट 731 गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरली आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा वोल्वार्ड्ट 725 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी 689 गुणांसह एलिस पेरी आहे. तर पाचव्या क्रमांकावर बेथ मूनी पोहोचली असून तिच्याकडे 685 गुण आहेत. मूनी आठव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी झेपावली आहे.
टी-20 क्रमवारीत मात्र ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी 794 गुणांसह पहिल्या स्थानी कायम आहे. टी-20 क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तर मंधाना 767 गुणांसह तिसऱ्या स्थानी ठामपणे टिकून आहे.
मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 63 चेंडूत 58 धावांची खेळी साकारली होती. यामध्ये तिने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. मात्र अर्धशतकाला शतकात बदलता आलं नाही, कारण ती रनआउट झाली. मानधनाच्या अर्धशतकानंतरही भारताला ऑस्ट्रेलियासमोर पराभव स्वीकारावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करत 281 धावा केल्या होत्या, पण प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फक्त 2 गडी गमावून 282 धावा करत सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून फीबी लिचफिल्ड चमकली, तिने 111 चेंडूत 88 धावा ठोकल्या आणि आपल्या खेळीत तब्बल 14 चौकार लगावले.
Comments are closed.